कोळसा खाण घोटाळ्यात माजी खासदार विजय दर्डा आणि केंद्रीय कोळसा खात्याचे माजी सचिव एच सी गुप्ता दोषी असल्याचा दिल्ली न्यायालयाचा निवाडा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) छत्तीसगडमधल्या कोळसा खाण घोटाळा प्रकरणात दिल्ली न्यायालयाने आज माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता यांना दोषी ठरवलं आहे. विशेष न्यायाधीश संजय बन्सल यांनी दर्डा यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, दोन वरिष्ठ अधिकारी के एस क्रोफा आणि के सी सामरिया तसंच जेएलडी  यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही दोषी ठरवलं आहे. शिक्षेसंदर्भतला युक्तिवाद १८ जुलै रोजी होणार आहे.  डॉ. मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना केंद्रातल्या यूपीए सरकारच्या काळात कोळसा खाण घोटाळा झाला होता.