मंत्री अनुराग ठाकूर यांची इंदू मिलमधल्या डॉ. आंबेडकर स्मारकाला भेट

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय माहिती आणि प्रसारण, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचा  मुंबई दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे. ‘सम्पर्कातून समर्थन’ या अभियानाअंतर्गत अनुराग ठाकूर यांनी विकास तीर्थ यात्रा उपक्रमा अंतर्गत मुंबईतल्या इंदू मिलमधल्या डॉ. आंबेडकर  स्मारकाला भेट दिली. मोदी सरकारच्या कार्यकाळात हे महत्त्वाचं स्मारक उभारले जात आहे, हे स्मारक आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील, असं यावेळी ते म्हणाले आंतरराष्ट्रीय  योग दिनानिमित्त सर्वांनी योग करण्याचं  त्यांनी आवाहन केलं .

G 20 देशांच्या महिला कार्यगटाच्या अध्यक्ष   आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त डॉ. संध्या पुरेचा यांची त्यांच्या मुंबईतल्या  निवासस्थानी भेट घेतली. प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते यांचीही  अनुराग ठाकूर यांनी भेट घेतली आणि गेल्या नऊ वर्षात प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं केलेल्या  कामांची माहिती त्यांना दिली .