आयुष्मान भारत योजना आणि महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजना यांचा एकत्रित लाभ देणारी कार्ड वितरित करण्यात येणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यातल्या १२ कोटी जनतेला केंद्रसरकारची आयुष्मान भारत योजना आणि राज्यशासनाची महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजना यांचा एकत्रित लाभ देणारी कार्ड वितरित करण्यात येणार असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज सांगितलं.

आयुष्मान भारत कार्ड निर्मिती आणि आरोग्यविषयक पायाभूत सुविधा या विषयांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर झालेल्या बैठकीनंतर आज मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात ६०० जनौषधी केंद्र असून सरकार त्यात आणखी भर घालणार असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा मोहिमेअंतर्गत राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात क्रिटिकल केअर युनिट उभारण्यात येणार आहेत.