महागाई विरोधातील लढा अद्याप संपलेला नाही, शक्तीकांत दास यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महागाई विरोधातील लढा अद्याप संपलेला नाही असं प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केलं आहे. 6 ते 8 जून दरम्यान झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार सर्वोच्च बँकांनी महागाई-वाढीची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं उपाययोजना करण्यासाठी तयार राहणे आवश्यक आहे, असं दास म्हणाले. नुकत्याच झालेल्या झालेल्या पतधोरण बैठकीत रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवले होते. अर्थव्यवस्था बळकट होत आहे, त्यामुळे विकासदर वाढण्याची शक्यता आहे असं दास यांनी सांगितलं. बँका आणि कॉर्पोरेट्सचे ताळेबंदही सुधारत असल्याचं त्यांनी सांगितलं.