पहिला भारत-फ्रान्स-यूएई सागरी संयुक्त सराव

 

नवी दिल्ली : पहिला भारत, फ्रान्स आणि युएई सागरी संयुक्त सराव 07 जून 23 रोजी ओमानच्या आखातात सुरू झाला.  आएनएस तरकश  आणि फ्रेंच जहाज सरकॉफ हे दोन्ही त्याचा अविभाज्य भाग असलेली हेलिकॉप्टर्स, फ्रेंच राफेल विमाने तसेच युएई नौदल गस्ती विमानांसह या सरावात सहभागी झाले आहेत.

दोन दिवसांच्या नियोजित सरावामध्ये नौदलाचा विस्तृत सराव आणि कामकाज होणार आहे. यात पृष्ठभागावरील युद्ध, तोफगोळ्यांचा मारा आणि पृष्ठभागावरील लक्ष्यांचा वेध घेण्यासाठी क्षेपणास्त्रांच्या कवायती, हेलिकॉप्टर क्रॉस डेक लँडिंग ऑपरेशन्स, प्रगत हवाई संरक्षण सराव आणि जहाजावर विमाने उतरवणे आदींचा समावेश आहे. या सरावामध्ये सर्वोत्तम सरावांच्या देवाणघेवाणीसाठी कर्मचार्‍यांचे एकमेकांच्या जहाजांवर जाणे देखील समाविष्ट असेल.

तिन्ही नौदलांमधील त्रिपक्षीय सहकार्य वाढवणे आणि पारंपरिक तसेच अपारंपरिक सागरी धोके दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याचा मार्ग मोकळा करणे हा या पहिल्या सरावाचा उद्देश आहे. या सरावामुळे या सागरी प्रदेशात व्यापार सुरक्षितता आणि प्रवास स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी सहकार्य वाढेल.

Popular posts
जल व्यवस्थापनासाठी लहान जल स्रोतांचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणं आवश्यक - उपराष्ट्रपती
Image
‘बार्टी’च्या महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये रुजू
Image
तिसऱ्या राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागरिकांना कुपोषण-मुक्त भारतासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आणि योगदान देण्याचे आवाहन
Image
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक नानासाहेब गर्गे यांचं निधन
Image
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड
Image