देशात ‘संपर्क से समर्थन मोदी ॲट द रेट 9’ हा कार्यक्रम सुरु

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात ‘संपर्क से समर्थन मोदी ॲट द रेट 9’ हा कार्यक्रम सुरु असून देशामध्ये झालेले बदल, उघडलेली विकासाची दारं, पायाभूत सेवा-सुविधांचा विकास आणि विकासाचा लाभ थेट जनसामान्यांपर्यंत पोहोचवायला सुरुवात झाली. देशात सकारात्मक वातावरण तयार झालं आहे, असं आमदार मनिषा चौधरी यांनी सांगितलं.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षाच्या कार्यकाळाची देताना आमदार मनिषा चौधरी यांनी मुंबईत बोलत होत्या. ‘जागतिक स्तरावर आपली अर्थव्यवस्था अकराव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आली आहे आणि लवकरच आपण तिसऱ्या स्थानावर झेप घेण्याच्या तयारीत आहोत.

असं वार्ताहर परिषदेत मनिषा चौधरी यांनी सांगितलं. तसंच आमदार मनिषा चौधरी यांनी स्टार्ट अप इंडिया, मुद्रा लोन, वंदे भारत ट्रेन, प्रधानमंत्री जन औषधी आदी योजनांबाबत  माहिती दिली.