दिव्यांगांसाठीच्या विशेष ऑलिम्पिक्स क्रीडा स्पर्धेत भारताची आतापर्यंत 191 पदकांची कमाई

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिव्यांगांसाठीच्या विशेष ऑलिम्पिक्स क्रीडा स्पर्धा 2023 चा सांगता समारोह काल मोठ्या दिमाखदार सोहळ्यानं जर्मनीतल्या बर्लिन मध्ये संपन्न झाला. 

या स्पर्धेमध्ये भारतानं 191 पदकांची कमाई केली असून काही खेळांच्या स्पर्धा अद्याप सुरु आहेत. रोलर स्केटिंग मध्ये भारतानं सर्वाधिक 27 पदकांची कमाई केली आहे. 9 दिवस चाललेल्या या खेळांमध्ये भारताचं एकंदर 198 खेळाडूंचं पथक 16 क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी झालं होतं, अशी माहिती दिव्यांगांसाठी होणाऱ्या या विशेष ऑलिम्पिक्स स्पर्धेच्या भारताच्या अध्यक्ष डॉ. मल्लिका नड्डा यांनी आकाशवाणीशी बोलताना दिली. भारतीय खेळाडूंच्या पथकानं काल एका दिवसांत 66 सुवर्ण, 50 रौप्य आणि 41 कांस्यपदकांसह 157 पदकांची कमाई केली.