लोकांपर्यंत पोहोचण्याची जादूई क्षमता मनोरंजन उद्योगात आहे - पीयूष गोयल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मनोरंजन उद्योगात लोकांशी थेट जोडले जाण्याची जादूई क्षमता असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. फिक्की या उद्योजक संघटनेनं मुंबईत आयोजित केलेल्या फिक्की फ्रेमन या कार्यक्रमात कॉमर्स मीट्स क्रिएटीव्हीटी या विशेष सत्रात आज ते बोलत होते.

नव्यानं उभारला जाणारा भारत जगासमोर मांडण्याचं काम माध्यमांना आणि मनोरंजन उद्योगाला उत्तम प्रकारे करता येईल असं ते म्हणाले. सकारात्मक वातावरणाचा प्रसार करून हे उद्योग अर्थव्यवस्थेलाही चालना देतात असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं सरकार मनोरंजन उद्योगाला पाठबळ देणारं असल्याचं ते म्हणाले.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image