कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं पूर्ण बहुमत प्राप्त केलं आहे. आतापर्यंत १८१ जागांचे निकाल जाहीर झाले असून त्यापैकी ११३ जागा काँग्रेस, ४७ भाजपा, १७ जनता दल धर्मनिरपेक्ष आणि ४ जागा अपक्षांना मिळालेल्या आहेत. एकूण २२४ जागांचा विचार करता आघाडी आणि विजय मिळवून काँग्रेस १३६, भाजपा ६५, जनता दल धर्मनिरपेक्ष १९ आणि अपक्ष ४ जागांवर आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासून काँग्रेसनं घेतलेली आघाडी कायम आहे.