जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाचं दुसऱ्यांदा समन्स

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडी, अर्थात सक्तवसुली संचालनालयानं दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. येत्या २२ तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना या समन्समध्ये केली आहे. आयएल आणि एफएस प्रकरणी हे समन्स बजावलं असल्याचं व-त्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. याआधी जयंत पाटील यांना गेल्या गुरुवारी हजर राहण्याबाबत समन्स बजावले होतं. मात्र त्यांनी वेळ वाढवून मागितली होती. त्यांची विनंती मान्य करत ईडीनं त्यांना एक आठवड्यानंतरची तारीख दिली आहे. 

जयंत पाटील यांच्याशी संबंधित काही संस्थांना 'आयएल अँड एफएस' प्रकरणात आरोपी असलेल्या काही आरोपी कंपन्यांनी 'कमिशन रक्कम' दिल्याचा आरोप ईडीनं केला आहे. याच व्यवहारांबद्दल जयंत पाटील यांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवला जाईल. मात्र या कंपनीसोबत आपला रुपयाचाही व्यवहार नाही, असं जयंत पाटील यानी म्हटलं आहे. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image