माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा अमेझॉन इंडियाशी सहकार्य करार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि अमेझॉन इंडिया यांच्यात आज देशाची रचनात्मक अर्थव्यवस्था आणि प्रतिभेला प्रोत्साहन मिळावं यासाठी नवी दिल्ली इथं एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. भारतीय मीडिया आणि  मनोरंजन उद्योगाचा  दुप्पट गतीनं विकास होत आहे आणि हा उदयॊग देशाच्या रचनात्मक अर्थव्यवस्थेमध्ये  महत्वपूर्ण योगदान देत असल्याचं माहिती आणि  प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

डिजिटल इंडियामुळे इंटरनेट, स्मार्टफोन आणि स्मार्ट टीवी पर्यंत या उद्योगानं  मजल मारली आहे.  तसंच त्यामुळे  ओटीटी प्लेटफॉर्म सारखी  मनोरंजनाची नवी माध्‍यम हि वेगानं लोकप्रिय होत आहेत असं  ठाकूर म्हणाले. आज चित्रपट, टेलीविजन आणि ओटीटी मनोरंजन क्षेत्राचा सर्वांगीण विकास होत असल्यामुळे भारतीय युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत असही ठाकूर यावेळी म्हणाले.