महिला सन्मान योजनेचा जिल्ह्यात १७ लाखाहून अधिक महिला प्रवाशांनी घेतला लाभ

 

पुणे : राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये घोषित केल्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कार्यान्वित केलेल्या महिला सन्मान योजनेचा महिनाभरात पुणे विभागातील बसेसमधून एकूण १७ लाख १४ हजार महिला प्रवाशांनी लाभ घेतला आहे.

राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. महामंडळाने १७ मार्च २०२३ पासून महिला सन्मान योजना कार्यान्वित केली असून पुणे जिल्ह्यात १६ एप्रिलपर्यंत १७ लाख १४ हजार महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

कोणत्या आगारात किती लाभार्थी:
जिल्ह्यात शिवाजीनगर आगारातून १ लाख १६ हजार, स्वारगेट १ लाख ७ हजार, भोर १ लाख ५५ हजार, नारायणगाव २ लाख ८९ हजार, राजगुरुनगर २ लाख २८ हजार, तळेगाव ७५ हजार, शिरुर १ लाख १८ हजार, बारामती २ लाख २८ हजार, इंदापूर १ लाख ७१ हजार, सासवड ९० हजार, दौंड ६३ हजार, पिंपरी-चिंचवड ५१ हजार, एमआयडीसी ८२ हजार असे एकूण जिल्ह्यात १७ लाख १४ हजार महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यातून एसटी महामंडळाला ६ कोटी ४२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली आहे.

Popular posts
सिक्कीममधील पुरात १४ जणांचा मृत्यू, १०२ जण बेपत्ता
Image
‘वसुधैव कुटुंबकम्’चे उद्दिष्ट गाठण्यासाठी योग सहाय्यक - राज्यपाल
Image
करगिल युद्धातील विजयाच्या २२ व्या स्मृतीदिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांद्वारे हुतात्म्यांना अभिवादन
Image
दावा न केलेल्या ठेवी शोधून त्या लाभार्थ्यांना परत मिळवून देण्यासाठी केंद्रीकृत संकेतस्थळ विकसित करण्याची भारतीय रिझर्व बँकेची घोषणा
Image
'इंद्रायणी स्वच्छता' जनजागृती मोहिमेअंतर्गत रीव्हर 'सायक्लोथॉन २०२२' रॅलीचे रविवारी आयोजन
Image