अहमदनगर मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता देईल, अशी उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अहमदनगर इथल्या वाडिया पार्क इथं आंतरराष्ट्रीय दर्जाच क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता देईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीसयांनी काल इथं दिली. महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या भाषणात अहमदनगर येथे क्रीडा संकुल उभे रहावे. अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या स्पर्धेतील ३५ लाख रूपये किंमतीची अर्धा किलोच्या सोन्याची गदा सोलापूरचे महेंद्र गायकवाड यांनी पटकावली.

अहमदनगर शहरातल्या वाडीया पार्क इथल्या जिल्हा क्रीडा‌ संकुलात छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी फडनवीस बोलत होते‌. 

फडनवीस म्हणाले की, कुस्ती हा आपला प्राचीन खेळ असून, छत्रपती शिवाजी महाराज यांनी या खेळाला राजाश्रय दिला. छत्रपती शाहू महाराज यांनी कुस्तीला पाठबळ दिले. पुढील ऑलिंपिक विजेता महाराष्ट्राच्या मातीतूनचं झाला पाहिजे. अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री फडनवीस यांनी यावेळी व्यक्त केली ‌. राज्याचे महसूलमंत्री विखे-पाटील म्हणाले की, अहमदनगर मध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या माध्यमातून एक नवे पर्व सुरू झालं असून, महाराष्ट्रातून एक हजाराहून अधिक मल्ल या स्पर्धांमध्ये सहभागी झाले होत.

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image