शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आज रेल्वेने अयोध्येला रवाना

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आज रेल्वेने अयोध्येला रवाना झाले. ठाणे इथं मुख्यमंत्र्यांनी या रेल्वेला भगवा झेंडा दाखवून रवाना केलं. जवळपास तीन हजारापेक्षा जास्त शिवसैनिक आणि रामभक्त या ट्रेनमधून उद्या अयोध्यामध्ये पोहोचतील. आणि परवा सकाळी त्यांचं  प्रभु रामचंद्रांच दर्शन होईल. 

अतिशय उत्साह आणि जोश या सर्व रामभक्तांमध्ये पाहायला मिळाला आणि म्हणून त्यांना आज निरोप द्यायला, या ठिकाणी त्यांना भेटायला आपण स्वतः आल्याचं  मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.