ड्रोन्स आणि ड्रोन्स साठी आवश्यक भागांसाठी पीएलआय अंतर्गत ३० कोटी रुपये वितरित

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ड्रोन्स आणि ड्रोन्स साठी आवश्यक भागांसाठी सरकारनं वर्ष २०२२-२३ मध्ये लाभार्थ्यांना पीएलआय अर्थात उत्पादन प्रोत्साहन योजने अंतर्गत ३० कोटी रुपये वितरित केले आहेत. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं सप्टेंबर २०२१ मध्ये ड्रोन्स आणि ड्रोन्सच्या घटकांच्या स्वदेशी निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं ही योजना सुरु केली होती. या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी आणि अभ्यासकांनी या योजनेचं कौतुक केलं आहे. या योजने अंतर्गत ड्रोन्सचे सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्यांचाही समावेश केला आहे, अशी माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं दिली आहे.