मार्चमधील अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानीचे १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

 

मुंबई : राज्यात मार्चमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती आणि फळ पिकांच्या बाधित क्षेत्रांचे बहुतांश जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाले आहेत. एकूण १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेतअशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली आहे.

४ ते २० मार्च २०२३ या कालावधीत राज्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस झाल्याने कडधान्य, फळपीके, भाजीपाला, गहूहरभराकांदाद्राक्षस्ट्रॉबेरीसंत्रामका इत्यादी पिकांचे नुकसान झाले. दि. ४ ते ९ मार्च २०२३ या कालावधीत राज्यातील ३८ हजार ६०६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून १५ ते २० मार्च या कालावधीत १ लाख ६० हजार ८८० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. मार्चअखेर एकूण १ लाख ९९ हजार ४८६ क्षेत्र बाधित असून हे सर्व पंचनामे करण्यात आलेले आहेत. निधी मागणीसाठी जिल्हानिहाय प्रस्ताव तयार करण्यात आले असून तत्काळ निधी वितरणाला मंजुरी दिली जाईलअसे मदत व पुनर्वसन विभागाने कळविले आहे. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image