14 फ्रेंच कंपन्या महाराष्ट्रात 5 हजार 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 14 फ्रेंच कंपन्या महाराष्ट्रात 5 हजार 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. त्यामुळे 5 हजार 300 थेट रोजगार निर्माण होणार आहेत. असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. इंडो-फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीनं मुंबईत आयोजित 'इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र' परिषदेत ही माहिती देण्यात आली. फ्रेंच कंपन्यांना महाराष्ट्रात वाढीसाठी मोठ्या संधी उपलब्ध होत असून, याद्वारे दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध अधिक दृढ होत आहेत, असं फ्रान्सचे वाणिज्य दूत ज्यों मार्क सिरे-शार्ली यांनी यावेळी सांगितलं.

भारत ही जगातली सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार होण्यासाठी  महाराष्ट्राची भूमिका महत्वाची असणार असून राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी फ्रेंच कंपन्यांचे सहकार्यही नक्कीच मोलाचे ठरेल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी यावेळी सांगितलं. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image