हिंगोली जिल्ह्यात गांजाचा साठा जप्त

 


मुंबई (वृत्तसंस्था) : हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ ते परभणी रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गांजाचा साठा जप्त केला. गुन्हे शाखेनं सापळा रचून काल संध्याकाळी ही कारवाई केली. या कारमध्ये नऊ लाख ६५ हजार रुपये किमतीचा गांजा आढळला असून, याप्रकरणी एका रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.