स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातची सुनावणी २८ मार्चला होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातली आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, आता पुढच्या मंगळवारी २८ मार्चला सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग आणि सदस्य संख्येतली वाढ आणि ती पुन्हा पूर्ववत करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, प्रभागरचनेचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडून काढून घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय, आदी मुद्यांवर अनेक याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत. न्यायालयाने ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिल्यानं निवडणुका दीर्घ काळ रखडल्या आहेत.