संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत विशेषाधिकार समितीची आज बैठक

 


मुंबई (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांच्या नेत्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत संजय राऊत यांना या आधी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी दिलेल्या निवेदनानंतर विशेषाधिकार समितीची आज दुपारी बैठक होणार आहे. अनियंत्रित वक्तव्यासाठी प्रसिध्द असलेले संजय राऊत यांच्यावर काय कारवाई करायची यावर चर्चा होणार असल्याची माहिती भाजपचे आमदार आणि विशेषाधिकार समितीचे सदस्य योगेश सागर यांनी  दिली. या बैठकीनंतर संजय राऊत यांच्या अडचणी वाढू शकतात.