महिलांच्या विकासाला अग्रक्रम देऊन देश प्रगतीपथावर वाटचाल करीत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महिलांच्या विकासाला अग्रक्रम देऊन देश प्रगतीपथावर वाटचाल करीत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. महिलांचं आर्थिक सक्षमीकरण या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमधे दूरदृष्यप्रणालीमार्फत ते बोलत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी केलेल्या तरतुदींची माहिती प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली. 

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं बांधून पूर्ण झाली आहेत त्यातली बहुतांश महिलांच्या नावावर असून महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना साडेसातटक्के व्याज दर देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

महिला बचत आणि स्वयंसहाय्यता गटांची भूमिका, श्रीअन्न उत्पादनात आदिवासी महिलांच्या पारंपरिक शेतीच्या ज्ञानाचं योगदान,  सहकारक्षेत्रात महिलांचा सहभाग, इत्यादींचा गौरवपूर्ण उल्लेख प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
मुंबईतील किल्ल्यांच्या विकास शासकीय निधीबरोबरच बाह्यस्त्रोताद्वारे राबविण्याचे नियोजन करावे – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image