राहुल गांधींवर अनुराग ठाकूर यांची टीका

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेगासस हेरगिरीचा मुद्दा पुन्हा उपस्थित केल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी कडक टीका केली आहे. या मुद्द्यावरून राहुल गांधी परदेशात भारताची प्रतिमा मलीन करत असल्याचं त्यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगभरात भारताचा सन्मान वाढल्याचं ते यावेळी म्हणाले. कालच्या निवडणुकीत काँग्रेला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे, तरी मतदारांनी दिलेला  कल विरोधी पक्षांनी स्वीकारला नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.