वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या जागांमध्ये ९४ टक्क्यांनी वाढ- केंद्रीय आरोग्यमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या जागा ९४ टक्क्यांनी वाढल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आपल्या ट्वीटर संदेशात दिली आहे. २०१३-१४ मध्ये एमबीबीएसच्या ५१ हजार जागा होत्या. त्या वाढून ९९ हजार झाल्या आहेत.

संपूर्ण देशात वैद्यकीय शिक्षणात अमुलाग्र बदल करण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर पदव्युत्तर शिक्षणासाठीच्या जागाही १०७ टक्कयांनी वाढल्याचं मांडवीय यांनी सांगितलं. २०१३-१४ मध्ये या जागा ३१ हजार होत्या, त्या आता वाढून ६४ हजार झाल्या आहेत.