उष्ण लहरींचा परिणाम रोखण्यासाठी राज्याने कृती आराखडा राबवावा

 


मुंबई: वाढत्या उष्ण लहरींचा परिणाम कृषी, सिंचन, ऊर्जा, वाहतूक अशा विविध घटकांवर होत असून भविष्यात यांचे प्रमाण वाढत जाणार, यासाठी राज्यस्तरावर कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आज येथील उष्णतेच्या लाटेचा धोका कमी करण्यासाठी राज्यस्तरीय योजनेवरील चर्चासत्रात विचार व्यक्त करण्यात आले.

राज्यातील समुद्र किनाऱ्यालगतचे प्रदेशही उष्ण असल्याचे आढळून येत आहेत. राज्य शासनासोबत नगरपालिका, महानगरपालिका या स्वायत्त संस्था उष्ण लहरींचे मानवी जीवनावर होणारे परिणाम रोखण्यासाठी कृती आराखडा राबवित असल्याची माहिती, राज्य आपत्ती व्यवस्थापन सल्लागार (युएनडीपी) श्रीदत्त कामत यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यात हवामान केंद्रे कार्यरत असून, उष्ण लहरींची माहिती जनमानसात पोहोचावी यासाठी जनजागृती केली जाते. तापमान वाढल्याने होणारे आजार, त्याची लक्षणे याची प्रसिद्धी विविध माध्यमातून केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

आयआरएडीएचे उपसंचालक रोहित मंगोत्रा, एनआयडीएमचे डॉ.अनिल गुप्ता, यांच्यासह छत्तीसगड व बिहारच्या शासकीय अधिकाऱ्यांनी चर्चासत्रात भाग घेतला.

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image