देशाच्या ऊर्जा वापरात २०३० पर्यंत नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी कर्नाटकातल्या बंगरूळ इथं इंडिया एनर्जी वीक  २०२३ उद्घाटन केलं. भारताच्या ऊर्जा वापरात २०३० पर्यंत नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्यासाठी सरकार मिशन मोडवर काम करत आहे. हरित  हायड्रोजन क्षेत्रात देखील भारत जगामध्ये आघाडीवर आहे असं प्रधानमंत्री उदघाटनप्रसंगीच्या भाषणात म्हणाले.   राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन २१ व्या शतकातील भारताला नवी दिशा देईल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणातून यावेळी व्यक्त केला.

तसंच या दौऱ्यात इंडियन ऑइलच्या इनडोअर सोलर कुकिंग सिस्टीमच्या  ट्विन-कूकटॉप मॉडेल उदघाटन केलं. आज उदघाटन करण्यात आलेला सोलर कुकटॉप भारतातील हरित  आणि स्वच्छ अन्न प्रकियेला  नवा आयाम देणार असल्याचं मत यावेळी प्रधानमंत्रानी व्यक्त केलं. यावेळी उपस्थित उद्योजकांना भारताच्या हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन यावेळी प्रधानमंत्रानी केलं. दुपारी साडे तीन वाजता प्रधानमंत्री  तुमाकूरू इथला  एच ए एल हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना राष्ट्राला समर्पित करतील. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image