नीट २०२३ परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप पूर्ण करण्याच्या अंतिम तारीखे वाढ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठीच्या नीट २०२३ परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप पूर्ण करण्याची अंतिम तारीख ११ ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इंटर्नशिपच्या अपूर्ण असल्यामुळे नीट परीक्षेसाठी पात्र नसलेल्या सुमारे १३ हजारहून जास्त एमबीबीएस विद्यार्थ्यांचं भविष्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

आरोग्य मंत्रालयानं बीडीएस विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप पूर्ण करण्याची अंतिम तारीख ३० जून पर्यंत वाढवली आहे. इंटर्नशिप अपूर्ण राहिलेले तीन हजारांहून अधिक बीडीएस विद्यार्थी नीट एमडीएस परीक्षेसाठी पात्र ठरले नाहीत. दरम्यान, पदव्युत्तर नीट परीक्षा ही पुढे ढकलण्यात आल्याचं वृत्त चुकीचं असून ५ मार्च या नियोजित तारखेलाच होणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.