ऑल इंडिया रेडिओच्या मन की बातच्या १०० व्या भागासाठी लोगो डिझाइन स्पर्धा

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मन की बातच्या १०० व्या भागासाठी लोगो डिझाइन अर्थात बोधचिन्ह निर्मिती साठी आकाशवाणीनं आयोजित केलेली स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेसाठी श्रोते १५ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका पाठवू शकतात. स्पर्धकांनी तयार केलेलं डिजिटल बोधचिन्हं कुठेही वापरता येईल असं असणं आवश्यक आहे. विजेत्याला एक लाख रुपये बक्षीस म्हणून दिले जातील. स्पर्धेचा विस्तृत तपशील mygov.in वर उपलब्ध आहे.