उत्तराखंडमधल्या जोशीमठमध्ये जमीन खचलेल्या भागात मदत आणि बचाव कार्याला वेग

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तराखंडमध्ये जोशीमठ इथं जमीन खचलेल्या भागात जिल्हा प्रशासनानं मदत आणि बचाव कार्याला वेग दिला आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली तसंच पीडितांची भेट घेतली. राज्य आणि केंद्र सरकार दुर्घटनाग्रस्तांच्या सोबत असून सर्वोतोपरी मदत करत आहेत, असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या दुर्घटनेसंदर्भातल्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. तर मुख्यमंत्री पुष्कर धामी प्रत्येक व्यवस्थेची देखरेख करत आहेत. ज्यांच्या घरांचं नुकसान झालं आहे त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्याला सरकारनं प्राधान्य दिलं आहे, असं त्यांनी सांगितलं. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image