सातारा जिल्ह्यातल्या मांढरदेव इथल्या काळूबाई देवीची यात्रेला प्रारंभ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सातारा जिल्ह्यातल्या मांढरदेव इथल्या काळूबाई देवीची यात्रा आजपासून सुरु झाली. आज पहाटे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांच्या हस्तेदेवीची शासकीय पूजा करण्यात आली. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस.जी. नंदीमठ, तहसीलदार रणजित भोसले, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. खंडाळा इथले राहुल कदम आणि रोशनी कदम या दाम्पत्याला यंदा देवीच्या शासकीय पूजेचा मान मिळाला.

मांढरदेवच्या काळूबाई देवीच्या यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आणि ठिकठिकाणी तपासणी पथकं  तैनात ठेवण्यात आली आहेत. यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. तसंच आरोग्य पथकं तैनात करण्यात आली आहेत.