आरोग्य विम्याची व्याप्ती वाढवण्यासोबतच जास्तीत जास्त संस्थाना समाविष्ट करण्यावर भर देणार - उपमुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आरोग्य विम्याचं संरक्षण कसं वाढवता येईल, त्यामध्ये पारदर्शकात कशी आणता येईल, सर्वसामान्यांपर्यंत ते कसे पोहोचवता येईल याकडेही लक्ष देणं आवश्यक आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खारघर इथं सांगितलं.

नवी मुंबईत भारती विद्यापीठ मेडीकव्हर रूगणालयाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. आरोग्य विमा संरक्षणाखाली जास्तीत जास्त संस्थांचा पर्याय उपलब्ध असेल तर कोणत्याही व्यक्तीला कॅशलेस पद्धतीचा वापर करून प्रक्रिया पूर्ण करता येईल असा प्रयत्न येत्या काळात करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्री जनारोग्य योजनेंतर्गत सामान्य नागरिकांना ५ लाखांपर्यंत आरोग्य विमा योजनेचं संरक्षण आहे.

तसंच राज्यात राबवण्यात येत असलेल्या महात्मा फुले जनारोग्य योजनेंतर्गत २ लाखांच्या विम्याचं संरक्षण दिलं जातं, अशी माहिती त्यांनी दिली. सरकारनं प्राथमिक आरोग्य केंद्रांची सुविधाही विस्तारित करण्यावर भर देणं आवश्यक असल्याचं मत  कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आ़णि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. 

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image