भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कुस्तीपटूंनी केले लैंगिक छळाचे आरोप

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर काही आघाडीच्या कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या आरोपावरून क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती महासंघाकडे  स्पष्टीकरण मागितलं आहे.नवी दिल्लीतल्या काही कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाच्या अध्यक्ष आणि प्रशिक्षकांवर केलेल्या आरोपांची गंभीर दखल क्रीडा  मंत्रालयानं घेतली आहे.

भारतीय कुस्ती महासंघाला पुढील ७२ तासांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.दिलेल्या मुदतीमध्ये उत्तर देण्यास अपयशी ठरल्यास,क्रीडा  मंत्रालय महासंघाविरुद्ध कठोर कारवाई करेल असंही यात स्पष्ट करण्यात आलं आहे. 

दरम्यान काल पासून लखनौ इथं  सुरु होणारं महिला राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण शिबिर रद्द करण्यात आले आहे. तर ब्रिजभूषण शरण सिंग यांनी लैंगिक छळाची कोणतीही घटना घडल्याचं नाकारलं असून आपण चौकशीसाठी तयार आहोत, असं म्हटलं आहे. 

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image