ऑस्करसाठी अकादमी ऑफ मोशन पिक्चरनं जाहीर केलेल्या पात्र चित्रपटांच्या यादीत भारतातल्या ८ चित्रपटांचा समावेश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी पात्र होणाऱ्या ३०१ चित्रपटांची यादी अकादमी ऑफ मोशन पिक्चर्सनं आज जाहीर केली. त्यात देशातल्या गंगुबाई काठियावाडी, कांतारा, द काश्मिर फाइल्स, छेल्लो शो - LAST FILM SHOW, रॉकेट्री, जंगल क्राय, इराविन निझल आणि मी वसंतराव या चित्रपटांचा समावेश आहे.

देशासाठी ही अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. या यादीत ‘मी वसंतराव’ या मराठी चित्रपटाचा समावेश आहे, याचा मला मनापासून आनंद आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे यांनी दिली आहे. मराठी चित्रपट आणि संगीत सृष्टीसाठी देखील हे महत्त्वाचं आहे असे मी मानतो.