जी-ट्वेंटी परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून सर्वपक्षीय नेत्यांना मार्गदर्शन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी - 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सर्व महत्त्वाच्या नेत्यांची नवी दिल्लीत बैठक घेतली. गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते या बैठकीत सहभागी झाले होते.