आरोग्यासाठीचं नव्हे तर पर्यावरण रक्षणासाठीही लोकांनी सायकलचा वापर करण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्यासाठीचं नव्हे तर पर्यावरण रक्षणासाठीही लोकांनी सायकलचा वापर केला पाहिजे, असं आवाहन केंद्रिय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित सायक्लोथॉन स्पर्धेत भाग घेतल्यानंतर बोलत होते.

या सायक्लोथॉनचं आयोजन वैद्यकिय विज्ञान केंद्रामधील राष्ट्रीय परिक्षा महामंडळानं केलं होतं. अनेक विकसित देश आज सायकलचा वापर करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. हरित जीवनपद्धती त्याचप्रमाणे आरोग्यदायक पृथ्वीसाठी लोकांनी एकत्र यावं, असं आवाहनही त्यांनी केलं.