मुंबई शेअर बाजारात तेजीला लगाम, निर्देशांकात ४१६ अंकांची घसरण

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशांतर्गत शेअर बाजारामधे गेल्या सलग ८ सत्रात सुरु असलेल्या तेजीला आज लगाम बसला. जागतिक शेअर बाजारांमधले नकारात्मक कल पाहून गुंतवणूकदारांनी विक्रीवर भर दिल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवस अखेर ४१६ अंकांची घसरण झाली आणि तो ६३ हजाराच्या पातळीखाली घसरुन, ६२ हजार ८६९ अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ११६ अंकांची घसरण नोंदवत १८ हजार ६९६ अंकांवर बंद झाला.