प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन कि बात कार्यक्रमासाठी लोकांकडून मागवल्या सूचना

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर रोजी प्रसारित होणाऱ्या मन कि बात कार्यक्रमासाठी लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. मन कि बात या कार्यक्रमाचा हा ९६ वा असेल. प्रधानमंत्र्यांनी लोकांना कार्यक्रमात संबोधित करायच्या विषयांवर त्यांचे विचार मांडण्यास सांगितले आहे.

मन की बात कार्यक्रमाचा हा या वर्षातला शेवटचा भाग असेल असं प्रधानमंत्र्यांनी एका संदेशात म्हटलं आहे. नागरिक आपल्या सूचना नमो अॅपवर आणि माय जीओव्ही फोरमवर तसंच 1800-11-7800 या टोल-फ्री क्रमांकावर पाठवू शकतात.