विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात विरोधकांचं अविश्वास प्रस्तावाचं पत्र

 

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाचं पत्र विरोधकांनी विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांना दिलं आहे. या पत्रावर सुनील केदार, सुनील प्रभू, सुरेश वरपुडकर, अनिल पाटील आदींसह सुमारे ३९ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

विरोधकांना बोलू न देता पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र या प्रस्तावाबाबत कल्पना नसल्याचं, वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.