महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील विविध संस्था आणि संघटनांच्या बळकटीकरणा साठी राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील विविध संस्था आणि संघटनांच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.या भागातील 865 गावांमधील सामाजिक, शैक्षणिक, धर्मादाय, सांस्कृतिक तसेच निम सार्वजनिक संस्था संघटनांना मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सीमाप्रश्नी अलिकडेच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमा भागातील मराठी बांधव आणि संस्थाना अर्थसहाय देण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. गुरुवारी या बाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री धर्मादाय निधीसाठी पुढील वर्षासाठी म्हणजे 2023-24 करता १० कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे.