हॉकी संघातले खेळाडू आणि सहकारी कर्मचाऱ्यांना रोख वार्षिक प्रोत्साहनपर बक्षिस देण्याची भारतीय हॉकी महासंघाची घोषणा

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हॉकी  खेळाडूंना सामन्यातल्या विजयानंतर रोख वार्षिक प्रोत्साहन बक्षिस दिलं जाईल अशी घोषणा काल भारतीय  हॉकी महासंघानं केली. खेळाच्या सामन्यात भारताने विजय मिळवल्यावर खेळाडूंना वार्षिक पन्नास हजार रोख आणि खेळाडू संघाच्या कर्मचाऱ्यांना पंचवीस हजार रुपये रोख बक्षीस दिले जाईल. या घोषणेमुळे जानेवारीत होणार असलेल्या विश्वचषक स्पर्धेसाठी तसंच आशियायी स्पर्धेसाठी संघाचा उत्साह वाढेल असं भारतीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी म्हटलं आहे. जानेवारीत १३ ते २९ या दरम्यान होणाऱ्या पुरुष हॉकी विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image