एसआरएच्या सदनिकांप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची सव्वा तास चौकशी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : वरळी इथल्या एसआरएच्या सदनिकांप्रकरणी आपण कुणाच्याही आरोपांना उत्तर देणार नसून, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची लवकरच भेट घेणार असल्याचं माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज सांगितलं.

वरळी इथल्या एसआरएच्या सदनिकांप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची तब्बल सव्वा तास दादर पोलीस ठाण्यात चौकशी झाली. त्या नंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. या प्रकरणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांवरून पेडणेकर यांना चौकशीसाठी बोलवलं होतं.