यंदाच्या रब्बी हंगामाकरता ५१ हजार ८७५ कोटी रूपयांच्या खत अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या रब्बी हंगामाकरता स्फुरद आणि पालाशयुक्त खतांसाठी अनुदानाच्या दरांना केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ५१ हजार ८७५ कोटी रूपयांचं खत अनुदान मंत्रिमंडळानं मंजूर केलं. १ ऑक्टोबरपासून पुढच्यावर्षी ३१ मार्चपर्यंत अंदाजाचे नवे दर लागू राहतील. जलसंपदा विकास आणि व्यवस्थापनच्या क्षेत्रात सहकार्याबाबत डेन्मार्कशी झालेल्या सामंजस्य करारालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.