भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त लष्करी प्रशिक्षण युद्ध अभ्यास उत्तराखंडमधील औली इथं सुरू होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त लष्करी प्रशिक्षण युद्ध अभ्यास आजपासून उत्तराखंडमधील औली इथं सुरू होणार आहे. अशा प्रकारच्या युद्ध अभ्यासाची ही १८ वी आवृत्ती आहे. १५ दिवस चालणाऱ्या या सरावात उंचीवर आणि अत्यंत थंड हवामानातील युद्धावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. अमेरिकी लष्कराच्या ११व्या एअरबोर्न डिव्हिजनच्या दुसऱ्या ब्रिगेडचे सैनिक आणि आसाम रेजिमेंटचे भारतीय सैन्य सैनिक या सरावात सहभागी होणार आहेत.

शांतता स्थापन करण्यातील लष्कराच्या कार्यवाहीचाही यात समावेश असून, आपत्ती निवारण आणि बचाव कार्यावरही यात भर दिला जाणार आहे. दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये सर्वोत्तम सराव, रणनीती, तंत्र आणि कार्यपद्धती यांची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशानं हा युद्ध अभ्यास दरवर्षी आयोजित केला जातो. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अलास्का इथं हा युध्द सराव झाला होता.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image