राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरुन हटवण्याची खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरुन हटवण्याची मागणी, भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. ते आज सातारा इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर आश्चर्य वाटत असल्याचं ते यावेळी म्हणाले.

आदर्श भारताची संकल्पना मांडणाऱ्या शिवाजी महाराजांचे विचार जुने कसे, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना यासंदर्भात पत्रं लिहीलं असल्याचं त्यांनी सांगितलं.