भारत इनोव्हेशन हब म्हणून जागतिक पातळीवर उदयास येत असल्याच प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की,जागतिक दर्जाची स्वतःची ओळख प्रस्थापित केलेल्या ८१ हजार स्टार्ट अप्स तसचं एक हजार संशोधन आणि विकास केंद्रासह भारत इनोव्हेशन हब म्हणून जागतिक पातळीवर उदयास येत आहे. बंगलोरच्या तंत्रज्ञान परिषदेचं दूरदृश्य पध्दतीने  उद्घाटन करतांना मोदी म्हणाले की भारतात, तंत्रज्ञान ही समानता आणि सक्षमीकरणाची शक्ती आहे.

तरुणांना माहितीच्या सुपर हायवेशी जोडल जात आहे. भारत गरिबीविरुद्धच्या युद्धात तंत्रज्ञानाचा सक्षमतेने  वापर करत असून तंत्रज्ञानाला मानवी स्पर्श कसा द्यायचा हे भारताने दाखवून दिले आहे. प्रधानमंत्री म्हणाले की, सरकार, देशातील  पायाभूत सुविधांचा विकास तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करत आहे. ते म्हणाले, PM गतिशक्ती, ऑनलाइन भौगोलिक माहिती पध्दत अर्थात GIS सक्षम पोर्टलद्वारे, देशातील मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी अनेक क्षेत्रांना एकत्र काम करण्यास मदत  मिळत आहे.