विजयादशमीच्या पूर्वसंध्येला राज्यात राजकीय शक्तीप्रदर्शनाची तयारी दसरा मेळाव्यानिमित्त सुरु

 


मुंबई (वृत्तसंस्था) : नवरात्रौत्सवाचा समारोप विजया दशमीने होतो. आश्विन शुद्ध दशमी हा दिवस राज्यात विविध कारणांनी साजरा होतो. शारदीय नवरात्रौत्सवाचं उत्थापन, शस्त्रपूजा दिन, शिलंगणाचा दिवस, या पारंपरिक सांस्कृतिक कारणांबरोबरच राजकीय आणि सामाजिक संघटनांचे महत्त्वाचे कार्यक्रमही या दिवशी होत असतात. यंदा शिवसेनेच्या दोन गटांचे दसरा मेळावे दोन वेगवेगळ्या ठिकाणी होणार असून, त्यानिमित्तानं शक्तीप्रदर्शन घडवण्यासाठी दोन्ही गटात चुरस सुरु आहे. जिल्ह्या-जिल्ह्यांमधून मेळाव्यासाठी कोणत्या गटाचे किती कार्यकर्ते जाणार याची चर्चा रंगली आहे.