केंद्र सरकार राज्याला दोन प्रकल्प देणार असल्याची देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार राज्याला दोन प्रकल्प देणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी आज वार्ताहर परिषदेत केली. राज्यात टेक्सटाईल पार्क सुरु होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पुण्यात इलेक्ट्रॉनिक मॅनुफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प उभारणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रातच होणार असल्याचं सांगून त्यातून नाणारचा भाग मात्र वगळण्यात येईल, असं ते म्हणाले.

केंद्राने पंचवीस हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव महाराष्ट्रासाठी मंजूर केले असून विरोधकांकडून महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव सुरु आहे यात महाराष्ट्राचं खूप नुकसान होत आहे असं ते म्हणाले. टाटा एअर बस आणि फॉक्सकॉन सारखे प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळातच गुजरात गेले असल्याचं त्यांनी सांगितलं.