नागरी हवाई उड्डाण क्षेत्र सामान्य माणसाच्या आवाक्यातलं असायला हवं - हवाई वाहतूक मंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी हवाई उड्डाण क्षेत्र अधिकाधिक खुलं आणि सामान्य माणसाच्या आवाक्यातलं असायला हवं असं प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी केलं आहे.  सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नागरी हवाई वाहतूक मंत्री आणि सचिवांची बैठक आज दिल्लीत होत आहे. त्यात ते बोलत होते. 

देशातल्या छोट्या शहरांमध्ये विमानतळ आणि विमानप्रवासाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर असून उडान योजने अंतर्गत देशभरात ७० नवे विमानतळ बांधण्यात आले असून, त्याचा लाभ आतापर्यंत एक कोटी प्रवाशांनी घेतला आहे, अशी माहिती सिंदिया यांनी दिली.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image