भारतीय वायू दलात डिसेंबरमध्ये ३ हजार अग्निवीर प्राथमिक प्रशिक्षणासाठी सहभागी करुन घेतले जाणार

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय वायू दलात येत्या डिसेंबरमध्ये ३ हजार अग्निवीर प्राथमिक प्रशिक्षणासाठी सहभागी करुन घेतले जातील, अशी माहिती वायूदल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी दिली आहे. वायूदल दिनानिमित्त चंदीगढजवळ सुखना तलाव इथं आयोजित संचलनाला संबोधित करताना ते बोलत होते. नव्या अग्निवीरांना सामावून घेणं हे आव्हानं असलं तरी त्यापेक्षा मोठी ती संधी आहे. या युवकांच्या क्षमता आणि देशसेवेसाठी असलेल्या प्राधान्याला योग्य मार्ग दाखवण्याची ही संधी असल्याचं ते म्हणाले. पुढच्या वर्षी महिला अग्निवीरांना सामावून घेण्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं