दिल्लीच्या एम्स संस्थेत गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणीसाठी कोल्पोस्कोप नावाचं उपकरण तयार - डॉ. नीरजा भाटला

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी करण्याकरता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन कोल्पोस्कोप नावाचं उपकरण दिल्लीच्या एम्स संस्थेत तयार करण्यात येत आहे. एम्सच्या स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. नीरजा भाटला यांनी आकाशवाणीला सांगितलं की पुढच्या वर्षीपर्यंत हे उपकरण तयार होईल. ह्यूमन पॅपिलोमा विषाणूमुळे उद्भवणाऱ्या गर्भाशयाच्या कर्करोगाचा प्रादुर्भाव दरवर्षी एक लाख २० हजार महिलांमधे होत असल्याचं आढळलं असून सुमारे ७७ हजार रुग्ण त्यामुळे मरण पावतात अशी माहिती डॉ.बाटला यांनी दिली. अलिकडेच विकसित झालेली गर्भाशयाच्या कर्करोगावरची लस सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाद्वारे सर्व मुलींना उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.