एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताकडून दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंडमधल्या रांची इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतानं १-१ अशी बरोबरी साधली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं सात गड्यांच्या मोबदल्यात २७८ धावा केल्या. एडन मरक्रम ७९ आणि रिझा हेंड्रिक्सनं ७४ धावा केल्या. भारताच्या मोहम्मद सिराजनं तीन बळी घेतले. वॉशिंग्टन सुंदर, शहाबाद अहमद, कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूर प्रत्येकी एक बळी घेतला. भारताने हे आव्हान तीन गड्यांच्या मोबदल्यात केवळ २५ षटक आणि पाच चेंडूत पूर्ण केलं. श्रेयश अय्यरनं  नाबाद ११३ आणि ईशान किशन ९३ धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. या मालिकेतला शेवटचा सामना उद्या दिल्ली इथं अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image